*कान्हापुरीच्या विकासात युवकांचा वाढता सहभाग आदर्शवत* - *पंढरपूरचे डी वाय एस पी प्रशांत डगळे यांचेकडून कौतुक*
पंढरपूर/प्रतिनिधी
आजचा ग्रामीण युवक हा काळानुरूप बदल स्वीकारत आहे. अनेक जण विविध परीक्षांमध्ये चमकताना दिसतात. तरीही ग्रामीण भागात मार्गदर्शन, पायाभूत सुविधांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीच दरी शेतकरी कुटुंबातील युवकांना सतावत असते. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचाराने समाजकार्य करण्यामध्ये पुढाकार घेण्यात युवकांचा वाढता सहभाग ,आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पंढरपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी गावात मुंबई येथील उद्योजक संदिप वर्तक यांचे संकल्पनेतून ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराचे सुशोभीकरण युवक नेते नानासाहेब शिंदे यांनी स्वखर्चातून केले. यावेळी आयोजित समारंभात कार्यक्रमात डगळे बोलत होते. ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करकंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर कुंजीर हे होते.
यावेळी कान्हापुरी गावातील युवा नेतृत्व नानासाहेब शिंदे, माजी सरपंच, मोतीराम गोसावी, माजी सरपंच स्मिता पाटील मॅडम, प्रेम चव्हाण, सागर पाटील, प्रवीण चौगुले, जीवराज चव्हाण, सोमनाथ शिंदे, काशिनाथ शिंदे, दादासाहेब शिंदे, मदन गोसावी, पिंटू शिंदे, रामचंद्र कांबळे, बालाजी पाटील, बालाजी लोहार, आप्पा शिंदे, संग्राम बामणे, हरी पवार, रशीद देशमुख, भारत शिंदे, बिनु शिंदे, अजित कालेल, सागर कांबळे, राजाभाऊ शिंदे, दतु नाना शिंदे, भगवान फरडे, पोपट फारडे, राहुल जाधव, दत्त्राय देवकर, भारत आपा वाघमारे, दिपाक फराडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते काळभैरवनाथ मंदिरात देवाची विधीवत पुजा करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना पोलीस उपाधिक्षक डगळे म्हणाले, नानासाहेब शिंदे या युवा कार्यकर्त्याने कान्हापुरी या छोट्याशा गावात समाजकार्य करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा आदर्शवत असुन ,त्यांनी गावच्या शैक्षणिक, आरोग्य समस्या सोडविण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोणतेही राजकिय पाठबळ नसताना केवळ स्वतः खर्च करुन गावात राबवित असलेले उपक्रमांचा आदर्श ईतर गावातील तरुणांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना पो.नि. सागर कुंजीर म्हणाले, गाव गाड्यातील तरूण युवकांनी व्यसनापासून दूर राहत आपल्या गावच्या विकासामध्ये एकत्रित येऊन थोडेफार योगदान दिल्यास नक्कीच गाव प्रगतीपथावर जाण्यास मदत होणार आहे. यावेळी नानासाहेब शिंदे यांनी तब्बल तीन लाख रूपये स्वखर्चातून ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर परिसरात केलेले सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई याची पाहणी उपस्थित यांनी केली.
चौकट......
*गावाच्या विकासासाठी धडपड राहणारच: नानासाहेब शिंदे*
कान्हापुरी या छोट्याशा गावाचा चौफेर विकास करण्यासाठी माझी कायम धडपड राहणार आहे.यासाठी मला मुंबई येथील उद्योजक संदिप वर्तक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. आत्तापर्यंत मी कोणतेही राजकिय पाठबळ नसताना गावच्या सामाजिक कार्यामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असुन भविष्यातही आरोग्य, शैक्षणिक, पाणी या सुविधांसाठी सतत प्रयत्न करणार आहे. ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर परिसरात आणि गावातील मुस्लिम कब्रस्तान परिसरात विद्युत रोषणाई मी स्वखर्चातून केली आहे. असे कानापुरीचे युवा नेते नानासाहेब शिंदे यांनी यावेळी सांगितले.