*बिटरगावर येथे विश्व साहित्यिक शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमाने साजरी*

*बिटरगावर येथे विश्व साहित्यिक शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमाने साजरी*

 पंढरपूर/प्रतिनिधी 

मौजे बिटरगांव तालुका पंढरपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिवशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक वर्धनी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर यांनी केले तर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन बिटरगांव चे माजी सरपंच संभाजी धनवे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनसेवक देविदास कसबे यांनी आपले विचार मांडताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये तसेच साहित्याचा वेगळेपणा यावेळी त्यांनी मांडला तसेच वाटेगाव ते रशिया या प्रवासामधील अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध संघर्षमय प्रसंग मांडले. फकीरा कादंबरी मधील नायक फकिरा इंग्रजांशी लढा देऊन आणलेला खजिना  गावकुसाबाहेर सर्वसामान्य माणसांना वाटून देत असत, फकीरा या नायकाचे लढाऊ पण अण्णाभाऊंनी जगभर पोहचविले आहे. अण्णाभाऊंचे साहित्यही सत्य डोळ्यांनी पाहिलेले सत्य घटनेवरील आधारित साहित्य संपूर्ण जगभर आज प्रसिद्ध आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनसेवक मा देविदास कसबे यांनी यावेळी मांडले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य राजेंद्र पराध्य सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीची उंची ही हिमालयाच्या उंची पेक्षाही मोठी असल्याचे सांगितले तसेच लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते त्यांचे भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान राहिलेले आहे प्राचार्य पराध्ये सर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.माजी सरपंच संभाजी धनवे यांनी आपले विचार मांडताना शिक्षक हे सेवेमधून निवृत्त होतात परंतु ते ज्ञानदानाच्या कार्यामधून कधीही निवृत्त होत नसतात असे म्हणाले,अध्यक्षांच्या भाषणानंतर शाळेसाठी भेट दिलेल्या विविध फुलांच्या वृक्षाची लागवड यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली  तर विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप लहुजी शक्ती सेनेचे तुंगत गटप्रमुख गणेश यादव यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर माने गुरुजी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक बाळासाहेब करपे गुरुजी यांनी मांडले या कार्यक्रमासाठी युवक कार्यकर्ते विलास सरडे ,बापू महानोर पाटील, माजी सरपंच भाऊसो धुमाळ, सुनील खंदारे, प्रशांत घाडगे ,चिंतामणी घाडगे, शाळेसाठी भोजन बनवणाऱ्या भगत मावशी, महादेव चव्हाण ,सागर धुमाळ ,केदार यादव इत्यादी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.