*शिवसेना आ. भरतशेठ गोगावले यांची साठे बंधूंच्या निवासस्थानी भेट* *लक्ष्मी टाकळी ग्राम सचिवालय इमारतीसाठी दोन कोटींचा टाकला शब्द*

*शिवसेना आ. भरतशेठ गोगावले यांची साठे बंधूंच्या निवासस्थानी भेट*  *लक्ष्मी टाकळी ग्राम सचिवालय इमारतीसाठी दोन कोटींचा टाकला शब्द*

पंढरपूर /प्रतिनीधी

 महाड रायगडचे लोकप्रिय आमदार .भरतशेठ गोगावले यांनी  शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे व लक्ष्मी टाकळीचे सरपंच .संजय  साठे यांच्या “विठाई”या निवास्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी टाकळी ग्रामपंचायत सरपंच संजयतात्या साठे, ग्रा.पं.सदस्या सौ.नगरबाई देविदास साठे, ग्रा.पं.सदस्य नंदकुमार वाघमारे, ग्रा.पं.सदस्य औदुंबर ढोणे, ग्रा.पं.सदस्य सागर सोनवणे, ग्रा.पं.सदस्या सौ.रेश्मा संजय साठे, ग्रा.पं.सदस्या सौ.रोहिणी महेश साठे, ग्रा.पं.सदस्या सौ.रुपाली सागर कारंडे यांच्यासह  गायकवाड सर ,नितीन खडतरे ,बोंडवे, सुदर्शन नागटिळक यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 यावेळी महाडचे आमदार  भरतशेठ गोगावले यांचेकडे  टाकळी ग्रामपंचायतच्या भव्य  ग्रामसचिवालयचे इमारतीसाठी २ कोटीच्या निधीची मागणी केली आहे.
  राज्यात सत्तांतर होताच अवघ्या काही दिवसात टाकळी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वतीने स्वतंत्र्य उमेदवार निवडणुकीत उतरले होते. त्यावेळी चार ग्रामपंचायत सदस्य  महेशनाना साठे यांच्या कुटुंबातून विजयी झाले होते. त्याच चार सदस्याच्या जीवावर मागील वर्षभर उपसरपंचपद साठे यांना देण्यात आले होते. त्यानंतर आतातर गावचे सरपंचपद मुख्यमंत्री शिंदे गटाचे संजय साठे यांचेकडे आहे. यामुळे याच सरकारच्या आणि आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत एक मोठ सचिवालय उभा करण्याचा विचार साठे बंधूंनी केला आहे. त्यासाठी निधीची मागणी केली आहे त्यासाठी नक्की निधी मिळणार असल्याने हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.हे मात्र नक्की आहे.