*मोहोळचे वारकरी बांधवानी केला राजू खरे यांचा पंढरीत येवून सत्कार*

*मोहोळचे वारकरी बांधवानी केला राजू खरे यांचा पंढरीत येवून सत्कार*

पंढरपूर /प्रतिनिधी 

मोहोळ येथील वारकरी सांप्रदायमधील अनेकजण रविवारी पंढरपूर येथील राजू खरे यांचे फार्महाऊस येथे येवून भेट घेतली. भेटीप्रसंगी खरे यांचा सत्कारही करण्यात आला.

या भेटीप्रसंगी भजन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य या विषयीची मागणी करण्यात आली.यावेळी मोहोळ येथील वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष धनाजी राऊत, सचिन शिंदे, सद्गुरु बारस्कर, नागनाथ माळी, कालिदास शेटे, चंद्रकांत बरकडे, जगदीश गोडसे, दत्तात्रय माळी, बापू सुर्यवंशी, नागेश मोठे, नानासो देवकते, आदींचा या वारकरी मध्ये समावेश होता.

   यापूर्वीही मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध गावातील भाजनी मंडळ यांनी आपले आगामी उमेदवार राजू खरे यांची भेट घेवून भजनी मंडळाचे साहित्य मागणी करताच, साहित्य वाटप केले आहे. यामुळे भजनी मंडळीमधून खरे यांची प्रतिमा चांगली झाली आहे.