*TET सक्ती विरोधात आंदोलन करताना मा. आमदार सावंत यांना दिल्ली पोलिसांकडून अटक 

*TET सक्ती विरोधात आंदोलन करताना मा. आमदार सावंत यांना दिल्ली पोलिसांकडून अटक 

पंढरपूर/प्रतिनिधी 
सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये,  ही प्रमुख मागणी घेऊन दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन, त्यांना अटक केली आहे..

TET परीक्षा सेवेत असलेल्या शिक्षकांनाही अनिवार्य केल्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे, देशभरातील शिक्षक त्यामुळे व्यथित झाले आहेत. महाराष्ट्रातील शिक्षकांनी या टीईटीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला आहे, मात्र त्यातून कोणताही ठोस मार्ग मिळत नसल्याने, काल पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे जंतर मंतर दिल्ली येथे उपोषणाला बसले होते, 
मात्र दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासोबत आमदार किशोर दराडे, मा. आमदार बाळाराम पाटील, मा. आमदार श्रीकांत देशपांडे या आंदोलनात सहभागी झाले होते..

यापुर्वी सावंत यांनी TET च्या विरोधात जिल्हा स्तरापासून देशस्तरापर्यंत प्रशासकीय पाठपुरावा केला आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्री यांना पत्रव्यवहारही केला आहे. 

सेवेत  असलेल्या शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. शासनाने देशभरातील शिक्षकांना यातून सुट द्यावी अन्यथा दिल्लीत यानंतर आणखी मोठे आंदोलन उभे करू,  असा इशारा सावंत यांनी दिला आहे..