*स्व. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी गावोगावी साजरी* *पंढरपूर तालुक्यात प्रत्येक गावात भजन कीर्तनासह सामाजिक उपक्रमाने वाहिली श्रद्धांजली*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या ६व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात भजन कीर्तनाने सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी राजकारणाबरोबर समाजकारण मोठ्या प्रमाणात केले होते. अनेक गोरगरिबांना मोठा आधार त्यांनी दिला होता. अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या प्रत्येक घराघरात स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जात आहे.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक संस्था उभा केल्या होत्या. त्या प्रत्येक संस्थेमध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली. टिळक स्मारक या ठिकाणी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातही श्रद्धांजली वाहण्यात आली. परिचारक यांचे निवासस्थान असलेल्या दोन्हीही ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. वाखरी येथे असलेल्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना कार्यालय याठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी ह.भ प. जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला.फुले वाहिल्यानंतर उपस्थितानी श्रद्धांजली वाहिली. तर त्याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले होते.त्याठिकाणी पांडुरंग परिवारातील अनेकांनी रक्तदान देवून अशा पद्धतीने मोठे मालक स्व. सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली वाहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली
वाखरी येथील या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना.श्री.गिरीषजी महाजन साहेब, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी मंत्री श्री.लक्ष्मणराव ढोबळे, श्री.मनोहरभाऊ डोंगरे, मा.आमदार दिलीपराव माने, मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मा.आमदार दत्तात्रय सावंत, मा.आमदार रामभाऊ सातपुते श्री.शिवाजीराव काळुंगे श्री.शिवानंद पाटील, श्री.अनिल सावंत, श्री.कल्याणराव काळे, श्री.बाळराजे पाटील, श्री.राहुल शहा, श्री.तानाजी खरात, श्री.बी. पी. रोंगे, श्री.संजय आवताडे, श्री.गणेश पाटील, श्री.शशिकांत चव्हाण, श्री.विक्रम शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवरांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
दरम्यान स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळपासून धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.