*करकंब येथील धाकटी वेस पुलाचे काम मार्गी लावणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिले आश्वासन.* : *धाकटी वेस पुला संदर्भात अशोक देशमुख यांनी घेतली होती आमदार बबनदादा शिंदे यांची भेट*:
करकंब /प्रतिनिधी
:-येथील अजितसिह देशमुख मित्र मंडळाच्या वतीने धाकटी वेस येथील पुलाची मागणी लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे व सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्याकडे केली होती. हा पुल जलद गतीने व पावसाळ्यापूर्वी करण्यात यावा. या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक शेतकरी ग्रामस्थ व शाळकरी मुलांची होणारी गैरसोय दूर व्हावी या अनुषंगाने अशोक देशमुख यांनी लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेऊन करकंब येथील धाकटी वेस येथील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला पुल मंजूर करावा व या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करून करकंब येथील नागरिकांची व शाळकरी मुलांची होणारी गैरसोय दूर करावी अशी यावेळी विनंती केली. यावेळी लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांनी या पुलाची अडचण समजून घेऊन लवकरच हे काम मार्गी लावू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ लोणावत महेश गुजरे नितीन दुधाळ संतोष शिंदे मिथुन चंदनशिवे शैलेश जवारे राजेंद्र खारे आदि उपस्थित होते.