*सोलापुरात भाजप अनुसूचित जाती मोर्चाची आढावा बैठक संपन्न* *भीमदूत - वस्ती संपर्क अभियाना'ची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात!*
सोलापूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या महत्त्वाकांक्षी 'भीमदूत - वस्ती संपर्क अभियाना'चा लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ करण्यात आला.
यानिमित्ताने सोलापूर येथील शिवस्मारक हॉलमध्ये सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या दोन्ही संघटनात्मक जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. तसेच या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली.
या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे होते.अनुसूचित जाती प्रवर्गातील सामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे व लाभ मिळवून देणे. कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.आगामी ध्येयधोरणे, संघटनेसमोरील आव्हाने आणि पक्ष विस्ताराच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,सुरज मस्के , दिलीप कांबळे प्रदेश पदाधिकारी ' अनुसूचित जाती मोर्चाचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमारे आणि सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे.अनेक नगरसेवक, दोन्ही जिल्ह्यांतील सर्व मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.