*चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृदधाश्रम येथे मिष्ठान्न भोजन* *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम*

पंढरपूर/प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
मा श्री कल्याणराव काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्ठांन्न भोजन वाटप .
आज गोपाळपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष मा . श्री नागेश दादा फाटे यांचे वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्ठांन्न भोजन वाटप करण्यात आले.

 .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र राज्याचे मनसेचे नेते मा. श्री दिलीप बापू धोत्रे  यांनी बोलताना स्वर्गीय वसंतदादा काळे यांचे या वृद्धाश्रम उभारणीत योगदान असल्याचे सांगितले आज त्यांचेच सुपुत्र मा . कल्याणराव काळे साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने  हा स्नेह भोजन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मा . श्री नागेश फाटे यांचे कौतुक करून चेअरमन साहेबांना उदंड व निरोगी दिर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या .
यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी चे अध्यक्ष मा . श्री सुधीर धुमाळ, मा .नगरसेवक मा . श्री . शकूर बागवान, मनसे तालुकाध्यक्ष .  श्री शशिकांत पाटील , उद्योग व व्यापार विभाग प्रद्रेश सचिव श्री . कल्याण कुसूमडे , महिला ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा सौ साधनाताई राऊत ,महिला किसान सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी ताई जाधव ,  उद्योग व व्यापार विभाग पंढरपूर ता. अध्यक्ष श्री उमेश सासवडकर आदि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आभार व्यवस्थापक राक्षे साहेब यांनी मानले .