*करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमानी संपन्न* *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना,साहित्य व खाऊ वाटप* *मनसेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा केला विशेष सन्मान

*करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमानी संपन्न* *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना,साहित्य व खाऊ वाटप* *मनसेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा केला विशेष सन्मान

 *करकंब/ प्रतिनिधी*-

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या माध्यमातून करकंब येथे मनसेचा 16 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी व समाज उपयोगी कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. करकंब येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली नंबर 2 व जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा क्रमांक एक मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा यावेळी विशेष सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम यावेळी राबवण्यात आले.*

: *यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, मुख्याध्यापक दत्तात्रेय खंदारे सर, मंगेश नकाते,  उद्योजक-बाजीराव नाना काळे, सुनील धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख बालाजी पवार, सतीश महाराज सोनकांबळे,किरण घाडगे, राजू केदार, महेश कवडे, हर्षद मेहकर आदीसह शिक्षक शिक्षिका बहुसंख्य ग्रामस्थ महिला विद्यार्थी विद्यार्थिनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते.*