*उद्या मंगळवारी भाळवणी येथे रस्त्यासह विविध विकास कामाचा शुभारंभ* *आ. शहाजीबापू पाटील आणि आ. परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातून सांगोला तालुक्यातील अनेक गावाहून जाणाऱ्या रस्त्याचे कामाचे उद्घाटन उद्या मंगळवारी भाळवणी येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी आ. शहाजीबापू पाटील आणि आ. प्रशांतराव परीचारक यांच्यासहअनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे वेळी रा.म
६५ते पेनूर, भोसे, पट कुरोली, भाळवणी, महिम,महुद, या प्र.जि. मा.५७/०००ते६३/०००
मध्ये रुंदीकरणसह सुधारणा करणे, अंदाजे4कोटी व इतर विविध विकास कामाचे उद्घाटन वरील मान्यवरांच्या हस्ते सकाळी10वाजता
करण्यात येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जि. प .सदस्य शोभाताई वाघमोडे, पांडुरंगचे संचालक भगवान चौघुले, माजी संचालक हरिभाऊ शिंदे, भाळवणी चे माजी उपसरपंच सुनील पाटील ,ठेकेदार पांडुरंग कन्स्ट्रक्शन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी वरील कार्यक्रम साठी सर्वांनी उद्या 4जानेवारी मंगळवारी सकाळी10 वाजता भाळवणी येथील बस स्टॅंड येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच विठ्ठल चौगुले, आणि उपसरपंच पूनम गवळी यांनी केले आहे.