*विठ्ठल वर संचालकाचे नव्हे तर सभासदांच्या हिताचेच नेतृत्व करू* *अभिजित पाटील यांची भूमिका स्पष्ट*
पंढरपूर ,/ प्रतिनिधी
विठ्ठल सहकारी साखर कारखाना मोठया अधोगतीला जाण्यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे ,या कारखान्यावरील नेतृत्वाकडून सभासद आणि कामगार यांचे हित पाहण्यापेक्षा केवळ राजकीय दृष्टया याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. तरी आपणास सभासद आणि कामगार बंधू यांनी जर सेवा करण्यासाठी संधी दिली. तर आपण आपल्या नेतृत्वाचा उपयोग कोणत्याही राजकीय ताकदीसाठी करणार नसून केवळ आणि केवळ कारखान्यातील सभासद आणि कामगार यांच्याच हितासाठी करणार असल्याची माहिती पॅनल प्रमुख अभिजित पाटील यांनी दिली आहे.
याच कारखान्यातील चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्ठीमुळे केवळ संचालक झाले मोठे अन खरे मालक असलेले सभासद मात्र छोटे अशी अवस्था झाली आहे. यामुळे आपण आपल्या योग्य नियोजनासाठी मला विठ्ठलच्या नेतृत्वाची संधी दिल्यास चालत असलेल्या बेकायदेशीर व्यवस्थापनावरच सुरुवातीला लगाम घालण्याचे काम करणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.
सध्याच्या संचालक मंडळातील जे संचालक आहेत. यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती याचा प्रत्येक सभासद आणि कामगार यांना लेखाजोगा पहावा, यामध्ये नेमकी उलट परिस्थिती पहावयास मिळू लागली आहे. अनेक संचालक यांनी या बेकायदेशीर चालू असलेल्या व्यवस्थापन मुळे कोटयावधीची माया जमविली आहे. काही संचालकांनी तर मोठा कहरच करून ठेवला होता. यामध्ये कारखान्यातील गाळप हंगामातील काही कामाचे ठेके घेतले होते. त्यावेळी ठेकेदारीसाठी लागणारे मजूर म्हणूनही कारखान्यातील काही कामगार यांना दबावापोटी काम करावे लागले होते. यातून त्या ठेकेदारीची बिलेही कशा पद्धतीने काढली जात होती. याची त्याठिकाणी असलेल्या कामगारांना सविस्तरपणे माहिती आहे. त्यामुळे कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कारखान्यातील कामापेक्षा संचालक यांच्या वैयक्तिक कामासाठी वाहनाचा मोठा वापर केला गेला आहे. यामध्येही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नेतृत्वाकडून कधीही सभासद आणि कामगार यांच्या हितासाठी कोणतीही योजना लागू केली गेली नाही, तर याउलट सभासद आणि कामगार यांचेच देणी कारखान्याकडे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वरील प्रकारे कोणत्याही प्रकारचा कारभार न करता केवळ कारखान्याचे वैभव पुन्हा एकदा निर्माण करून दाखविण्यासाठी आमच्या पॅनलला एक वेळ संधी द्यावी असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले .