* करकंब जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारच-:युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल*
करकंब/ प्रतिनिधी:
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बळीराजा शेतकरी संघटना च्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबरच त्यांना न्याय देण्यासाठी तसेच या जिल्हा परिषद गटातील तळागाळातील सर्वसामान्य वंचित लोकांना त्यांच्या हक्काच्या योजना तसेच या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद च्या माध्यमातून विविध योजना मार्गी लावण्यासाठी मी स्वतः बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत या करकंब जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी सांगितले.
या करकंब जिल्हा परिषद गटातील अनेक शेतकरी बंधूंना तसेच सर्वसामान्य लोकांना यापूर्वी या संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर आंदोलन करून वेळ प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल झाले असतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले व यापुढेही या माध्यमातून हे काम अखंडितपणे सुरूच राहणार असून यासाठी शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या व तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या विविध प्रश्नांसाठी या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील लोकांच्या गाठीभेटी तसेच चर्चा करून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बळीराजा शेतकरी संघटना च्या माध्यमातून लढवणार असल्याचे स्पष्ट मत युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणातील शेतकरी सर्वसामान्य तसेच युवा वर्गातून प्रचंड प्रमाणात नाराजी असल्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापितांना धूळ चारणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी सांगितले*