*करकंब येथील धाकटी वेस ओढ्यावरील पुलाचे बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण....!* *माढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून"व अजित्सिंह देशमुख मित्र मंडळाच्या पाठपुराव्याला यश.
करकंब/ प्रतिनिधी:
-येथील अजित्सिंह देशमुख मित्र मंडळ यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने माढा -पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब यांच्याकडे करकंब येथील धाकटी वेस येथील पुलाच्या कामासंदर्भात वारंवार पणे पाठपुरावा करून या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करून पावसाळ्यापूर्वी हे काम सुरु करण्यात यावे याची मागणी केली होती. या पुलावरून शालेय विद्यार्थी ग्रामस्थ शेतकरी व्यापारी आबालवृद्ध महिला यांची मोठी जाता येता कुचंबणा व अडचण निर्माण होत होती. अनुषंगाने लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या माध्यमातून करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब येथील उपविभाग अधिकारी डी ए पाटील, शाखा अभियंता वैभव पंडित समक्ष पाहणी करून या धाकटी वेस येथील पुलाचे सर्वेक्षण केले. व लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल असे यावेळी सांगितले.
अजितसिंह देशमुख यांनी या कामासाठी आमदार बबनदादा शिंदे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामाला गती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने शासकीय अधिकारी यांनी या ओढ्याची पाहणी केली .व लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्याशी चर्चा करून अहवाल देणार असून ओढ्यावरील पूल मंजूर करून नागरिकांची अडचण समजून घेऊन हे काम मार्गी लावू असे आश्वासन श्री पाटील साहेब यांनी दिले.
यावेळी अशोकसिंह देशमुख यांनी या पुलाचे काम लवकरात लवकर काम पूर्ण होऊन नागरिकांचे गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे असे सांगितले.
यावेळी मिथुन चंदनशिवे रमेश खारे धोंडीराम काशीद संतोष शिंदे रोहन हराळे राजेंद्र खारे शैलेश जवारे नितीन दुधाळ महेश गुजरे रामचंद्र सलगर विजय जाधव फिरोज कोरबु नागेश शेटे इत्यादी करकंब येथील नागरिक यावेळी उपस्थित होते.