*खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून करकंब च्या शिवकालीन वेशीसाठी पाच लाख निधी....!* *जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे विशेष प्रयत्न.*

*खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून करकंब च्या शिवकालीन वेशीसाठी पाच लाख निधी....!*  *जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे विशेष प्रयत्न.*

करकंब/ प्रतिनिधी

:-सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू व आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी करकंब येथील शिवकालीन असलेल्या थोरल्यावेशेतील वेशीच्या दुरुस्तीसाठी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पत्राद्वारे निधीसाठी शिफारस केलेली होती. या वेशीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी विशेष प्रयत्न केले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार निधीतून पाच लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्याबाबतचे पत्रही नुकतेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू व आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या उपस्थितीत करकंब येथील श्री शिवप्रतिष्ठान, थोरली वेस् करकंब यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी श्री  शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष बंडू खपाले,मा. जिल्हा परिषद सदस्य-बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सदस्य-राहुल काका पूरवत,पांडुरंग व्यवहारे, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस -लक्ष्मण वंजारी, अमरसिंह चव्हाण, पै. औदुंबर कुंभार, सचिन चरपे, विजय मामा माळी भाजपा अध्यक्ष बंडू कुलकर्णी आदिसह श्री शिवप्रतिष्ठानचे सहकारी ,पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान थोरली वेस, च्या सहकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांची भेट घेऊन करकंब येथील शिवकालीन वेशीच्या दुरुस्तीच्या निधीसाठी चर्चा केलेली होती. त्यावेळी प्रशांत मालक परिचारक यांनी या शिवकालीन वेशीसाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिलेले होते. त्याच अनुषंगाने नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतून विशेषता लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घडवून निधी उपलब्ध करून दिला.
करकंब येथील या शिवकालीन थोरल्या वेशीतील वेशीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू व आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे ग्रामस्थांच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या निमित्ताने का होईना... सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू व आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे करकंब गावावर असलेले......विशेष प्रेम.... या निमित्ताने दिसून आले.