*पंढरीतील आंदोलकांनी आ. शहाजीबापू यांनाही वंगविले*! *आ. आवताडे यांना अडविले तर आ बबबदादा शिंदे यांच्या प्रतिमेला मारले जोडे* *पंढरपूर तालुक्यातील अन् सत्तेतील आहेत आमदार*
महालिंग दुधाळे /पंढरपूर
राज्यभरातून मराठा आरक्षणाची मागणी अधिकच तीव्र होत आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसून येत आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता सांगोला विधानसभा मतदार संघाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी येथील नवीन कऱ्हाड नाका वरुन पंढरपूर शहरात एन्ट्री केली होती. यावेळी येथील मराठा समाजातील तरुण आंदोलन कर्त्यानी गाडी अडविली. यावेळी चालकाने आपल्या रुबाबात ही गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करीत कार्यकर्त्यांच्या गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ही गाडी अडविण्यात आली.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक झळकत आहेत . त्यातूनही आ. शहाजीबापू पाटील यांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. परतू त्यामधून त्यांना माघारी जावे लागले.आ. शहाजीबापू पाटील हे सत्तेतील आमदार आहेत. त्यांनी गाडीतून उतरून अक्षरशः हात जोडले. त्यांच्या समोरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याबरोबरच आमदार यांच्या बद्दलजी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
मागील आठवड्यात पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांचीही गाडी अडवून पुन्हा इकडे न येण्याची सूचना केली. त्यावेळी आ. आवताडे यांनी मी मराठा समाजाचे बाजूने असल्याचे सांगून टाकले होते. तर आ. बबनदादा शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत. आ. शिंदे यांच्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे सोशल मीडियातून व्यक्त केले जात आहे.
वरील तिन्ही आमदार हे सत्ताधारी गटाचे आहेत. त्यांना पंढरपूर येथील मराठा समाज आणि आंदोलक यांनी सोडले नाही. पंढरपूर भागातून या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने या भागात येणाऱ्या एस टी बसेस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
चौकट
*आ. शहाजीबापूंची हात जोडून विनवणी*
आपल्या विनोदी शैलीने गाजलेले संगोल्याचे शिवसेनेचे आ शहाजीबापू पाटील यांना मराठा आंदोलनकर्त्यानी अडविले. बघता बघता जमाव वाढू लागला. यावेळी मात्र बापूंनी अक्षरशः हात जोडून आंदोलनकर्त्यांच्या कानात माजी राज्यात अब्रू घालवू नका अशी विनवणी केली. तरीही त्यांना पुढे जाऊ न देता माघारी पाठविण्यात आले.