*राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले निवेदन**
लातूर/प्रतिनिधी
लातूर ,ओबीसी महासंघाच्या वतीने दिनांक २२ सप्टेंबर 2021 रोजी लातूर जिल्हा ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती पोट निवडनुकी आगामी काळात होत असून होऊ घातलेल्या जणगणणेमध्ये ओबीसी संवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच भारतीय संविधानाच्या कलम २४३ (डी ) (६) आणि संविधानाच्या कलाम २४३ (टी ) (६) सुधारणा (अमेंडमेंट ) करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हापरिषद महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत मध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. असुन मा.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करण्याची घटनेत तरतूद किंवा सुधारणा करावी व संपूर्ण देशातील ओबीसीना न्याय मिळवून द्यावा.अश्या प्रकारच्या मागण्या निवेदन द्वारे करण्यात आल्या असून निवेदन देतेवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अडवोकेट माधवराव कोळगावे, प्रा. धनंजय बेड्डदे, अशोक चव्हाण, श्रीनिवास आकनगिरे, भाऊसाहेब शेंद्र, श्रीमती उषा राठोड, सुदर्शन बोराडे, श्रीकांत मुद्दे,अड. ब्रह्माजी केंद्र , भागवत पांचाळ, काळे भरत, बाळासाहेब पन्हाळे, बंटी राठोड, शरद राठोड , विजयकुमार टाकेकर, दिलीप पिनाटे, वामनअंकुश , संजय कुमार शिरसागर, बालाजी बादाडे, राजकुमार चोपडे, विश्वनाथ जाधव, बालाजी भंडारे, प्रभाकर आवासकर, हिरालाल पाटील, माने सर,यांसह अनेक जण उपस्तीत होते.