*विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी चे फॉर्म भरण्यास मुदतवाढ* *स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध* !

*विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी चे फॉर्म भरण्यास मुदतवाढ*  *स्वेरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध* !

पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान व औषध निर्माणशास्त्र या पदवी आणि एमसीए, एमबीए या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या 'सीईटी-२०२१' या प्रवेश परीक्षांच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे'.अशी सूचना स्टेट सीईटी सेल, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरुन कळविले आहे.
              शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या त्या कोर्सची 'सीईटी २०२१' ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सदर अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता गुरुवार, दि. १२ ऑगस्ट २०२१ ते सोमवार, दि.१६ ऑगस्ट २०२१ (रात्री-११.५९) पर्यंत तर पूर्वी ऑनलाईन भरलेल्या अर्जातील नाव, फोटो आदी दुरुस्त्या करण्यासाठी दि.१४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट,
२०२१ (रात्री-११.५९) पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार देण्यात आलेली असून आधीच्या मुदतीत सदर अर्ज न भरलेल्या व आधी भरलेल्या अर्जात ठराविक चुका राहिलेल्या आहेत अशा विद्यार्थी आणि पालक यांनी या मुदतवाढीची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूका होत असतात आणि धावपळ ही होत असते. त्या दृष्टीने स्वेरी अभियांत्रिकी च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग व एमबीए या विभागांमध्ये 'सीईटी २०२१' साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे. ‘एमएचटी-सीईटी २०२१’ संदर्भात व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीये संदर्भात अधिक माहितीसाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (मोबा.क्र.९८६०१६०४३१) तसेच प्रा. उत्तम अनुसे (मोबा.क्र.९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.