*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*  *सलग दोन दिवस राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव सुरूच*

*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*   *सलग दोन दिवस राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव सुरूच*

पंढरपूर/प्रतिनीधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे  प्रदेशाध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखानाचे संचालक नागेशदादा फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सलग दोन दिवस या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छाचां वर्षाव सुरू आहे.

या झालेल्या विविध उपक्रमांमध्ये  गुरुवारी सकाळच्या सत्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग यांचे वतीने मार्केट यार्ड ऑफिस पंढरपूर येथे करण्यात आले होते. यावेळी दादांचे स्नेही, मित्रपरिवार अशा विविध रक्तदात्यांनी रक्तदानास भरभरून प्रतिसाद दिला. सकाळी ११ते ७ पर्यंत रक्तदान सुरू होते. 

यांनतर दुपारच्या सत्रात मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँक लिमिटेड पंढरपूर या शाखेच्या वतीने वयोवृद्ध निराधार लोकांना मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. तसेच रा . काँ . पा . उद्योग व व्यापार विभाग यांच्या वतीने गादेगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करण्यासाठी गादेगाव ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवून वृक्षारोपण करण्यासाठी सहकार्य केले नागेश दादा फाटे हे राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात दादांचे योगदान खूप मोठे असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभर दादांचा सत्कार करुन तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाद्वारे , व्हाट्सअप द्वारे फेसबुक द्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.


 याप्रसंगी धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा प्रा.शिवाजीराव काळुंगे सर,भारतनाना कोळेकर,मोहन नागटिळक,मोहन बागल,सुधाकर कवडे,योगेश ताड, धनंजय काळे, किरण घाडगे,आण्णासाहेब नागटिळक,गोरख बागल,नानासाहेब जाधव, गणेश बागल,शिवाजी पवार,सुभाष बागल, जगन्नाथ जाधव,दिपक येळे,शिवाजी शिंदे, अनिल बाबर, दिलीप भोसले, नवनाथ पोरे,मोहन डावरे,मोहन अनपट, आण्णासो फाटे,सद्दाम मेरी,रामभाऊ मोरे, जालिंदर कुसुमडे, शिवाजी जाधव,वर्षा शिंदे, आदी मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पवार, कल्याण कुसुमडे डॉ.रमेश फाटे, औदुंबर माने, सतिश बागल, उमेश फाटे, प्रताप पवार, शशिकांत माने सह एन.पी.कंन्ट्रक्शनचे सर्व कर्मचारी व श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड बॅंकेचे सर्व कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडला.