*सांगवी बादलकोट लसीकरणात अग्रेसर* . *ग्राम सुरक्षा यंत्रणा झाली कार्यरत*.

करकंब/ प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील सांगवी - बादलकोट गावातील लसीकरण ८५ ते ९० % पूर्ण झाले आहे. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सांगवी व बादलकोट गावांमध्ये सुमारे एक हजार हूनअधिक लोकांनी लसीकरण केलेले आहे.तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणा ही कार्यान्वयीत झाली आहे. तसा गावात डेमो कॉल घेण्यात आला आहे. यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ. सचिन लवटे ,अर्चना कांबळे ,मीना शिंदे,कविता शिंदे,सविता साठे,मैना गेजगे,या सर्व आशा सेविका,तसेच अंगणवाडी सेविका देशपांडे मॅडम,चव्हाण,शिंदे,नायकुडे हे सर्व अंगणवाडी सेविका याचे हे सहकार्य लाभले आहे. व गावचे सरपंच भूषण चव्हाण ,उपसरपंच योगेश पाखरे,सदस्य नारायण चौगुले,मोहन आडसुळ,सुनिल शिंदे,नवनाथ भोसले,बिभीषण पांढरे,विठल कदम,बापू गलांडे,मल्हारी गलांडे,शंकर कदम ग्रामपंचायत कर्मचारी रवी गलांडे, शंकर आडसुळ नामदेव मदने, ग्रामसेवक डॉ.सतिश दादा चव्हाण .व तंटामुक्तीचे अध्याक्ष विजय जाधव, पोलीस पाटील नारायण जाधव या सर्वाचेच मनापासुन धन्यवाद मानले .