.‌‌*पंढरीतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आता किडनी विकारांवर होणार उपचार*  *आता मुंबई हैदराबाद जाण्याची गरज नाही पंढरपूरमध्येच उपचार*

.‌‌*पंढरीतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आता किडनी विकारांवर होणार उपचार*   *आता मुंबई हैदराबाद जाण्याची गरज नाही पंढरपूरमध्येच उपचार*

पंढरपूर /प्रतिनिधी

मूत्राशय आणि किडनी विकारांबाबत आता पुणे, मुंबई ,हैदराबाद येथे जाण्याची गरज उरली नाही. डॉ. संजय देशमुख आणि डॉ. मंजुषा देशमुख यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आता हे सर्व उपचार अगदी खात्रीने केले जाणार आहेत. मुतखडा आणि किडनी विकार तज्ञ डॉ. अविनाश पवार यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली‌.

पंढरपूर मधील लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल वरचेवर अत्याधुनिक होत चालले आहे. या हॉस्पिटलच्या एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जावेत, असा आशावाद बाळगून डॉ् संजय देशमुख आणि मंजुषा देशमुख यांनी आजपर्यंतचा प्रवास नेटाने केला आहे. हृदयविकार, पोटाचे विकार , नेत्रविकार, डायलिसिस, यासह अस्थिरोग आणि आता मुतखडा आणि किडनीवर उपचार 
करण्याची संधी या हॉस्पिटलला प्राप्त करून देण्यात डॉ.देशमुख दाम्पत्याला यश मिळाल्याचे दिसत आहे.

किडनी विकार तज्ञ डॉ.अविनाश पवार यांनी एमबीबीएसचे शिक्षण केईएममध्ये घेतले असून , या पुढील शिक्षण त्यांनी हैदराबाद येथे घेतले आहे. आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये मुतखडा, क्रिएटिनीन, सूज आणि किडनीच्या वेगवेगळ्या विकारांवर उपचार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. किडनीचे डायलिसिस आणि किडनीच्या अनेक विकारांवरील शस्त्रक्रिया या ठिकाणी केल्या जातील. बहुतांश शस्त्रक्रियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान आरोग्य योजना यासारख्या योजनांचा कायदा या ठिकाणी करून दिला जाईल, पंढरपूर आणि पंढरपूर परिसरातील आसपासच्या नागरिकांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा , असे आवाहन लाईफ लाईन हॉस्पिटल मधील मुतखडा व किडनी विकार तज्ञ डॉ्. अविनाश पवार यांनी केले आहे.