*करकंब च्या पूर्व भागाचा पाणी प्रश्‍न पेटणार......?*  *निष्क्रिय प्रस्थापितांना   करकंबच्या गाव तलावात पाणी सोडणे न जमल्यामुळे ! भाजपा करणार प्रयत्न*.*करकंब पाझर तलावात पाण्याचा फाटा सोडून पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील*

 *करकंब च्या पूर्व भागाचा पाणी प्रश्‍न पेटणार......?*  *निष्क्रिय प्रस्थापितांना   करकंबच्या गाव तलावात पाणी सोडणे न जमल्यामुळे ! भाजपा करणार प्रयत्न*.*करकंब पाझर तलावात पाण्याचा फाटा सोडून पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील*

करकंब/ प्रतिनिधी:

 करकंबच्या गावलगत असलेली  ब्रिटिश कालीन असलेला सुमारे पंचेचाळीस एकर मध्ये असलेला गाव पाझर तलाव असून हा गाव पाझर तलाव गेल्या सन 2005 पासून ते आज तागायत पणे कोरडा आहे. या गाव पाझर तलावाच्या माध्यमातून जर हा गाव पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर गावातील तसेच या परिसरातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पाण्याची टंचाई दूर होईल.  
परंतु या भागातील शेतकरी याची  खूप दिवसापासून या तळ्या मध्ये पाणी सोडण्याची इच्छा आहे यासाठी वारंवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील पाणीदार आमदार बबनरावजी शिंदे यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा त्यांना काही यश आलेले नाही. देशाचे माजी कृषिमंत्री राज्याचे सर्वेसर्वा आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. करकंब आणि करकंबपरिसराची आजच नव्हे अगदीपूर्वीपासून नाळ जोडलेली आहे. द्राक्ष बागायतदार संघापासून मुख्यमंत्री म्हणून स्वतः सुशीलकुमार शिंदे यांचे बरोबर त्यांचा पूर्वीचा करकंब चा सलोखा आहे. 
मोडनिंब वितरेकेतून पाण्याचा कालवा (फाटा) या गाव पाझर तलावात सोडून इतर कायम दुष्काळाने होरपळलेल्या करकंबचा पूर्व भाग , टेंभी परिसर , बार्डी,जाधववाडी व या परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जर पाण्याचा फाटा शेतकऱ्यांसाठी केला तर याचा  निश्चितच शेतीस्  व  पिण्यासाठी उपयोग होणार असल्याने हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. यामुळे निश्चित पणाने याचा पूर्णता सर्वे करून करकंब येथील पाझर तलावात पाण्याचा फाटा सोडण्यासाठी व या पूर्व भागातील परिसरातील गावांना जलसिंचन ना खाली आणण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी सांगितले.
करकंब गाव पाझर तलाव, तसेच करकंब चा पूर्वीपासून कायम पणे दुष्काळाने होरपळलेलला पूर्व भाग, पूर्व भागातील तसेच या परिसरातील शेतकऱ्यांसाठी माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दिल्ली येथे जाऊन त्यांच्यांशी याबाबत सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात केंद्रातील वन विभाग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अडचणी तसेच राज्यातील येणाऱ्या अडचणी चा निश्चित पणाने पाठपुरावा करण्याचे वेळोवेळी चर्चेदरम्यान आश्वासन दिले. भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून तुळशी ता .माढा पासून ते करकंब ,  बार्डी, जाधव वाडी पर्यंत पूर्व भागातील सर्व क्षेत्र जलसिंचन व्हावे या तळमळीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापुढे काम करणार असल्याचे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी सांगितले.