*पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी मधुकर फलटणकर यांची निवड*
पंढरपूर-/प्रतिनिधी
पंढरपूर शहर युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष ते कॉंग्रेस ओबीसी शहराध्यक्ष पदावर काम करत असताना केलेल्या कार्याची दखल घेत शहराध्यक्ष राजेश भादुले आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शहर कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी मधुकर फलटणकर यांची निवड करुन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे.
मधुकर फलटणकर यांनी कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन वाटप असेल, पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, पुराने थैमान घातलेले असताना पुरामुळे सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरीत केले असता त्या व्यक्तींना नाष्टा व चहा जेवणाची सोय असेल किंवा कोरोना काळात सलग दोन महिने त्यांनी मसाला राईस वाटप करत कोरोना काळात ड्युटीवर असलेले पोलीस मित्र असतील किंवा अनेक शासकीय कर्मचारी यांना चहा किंवा सरबत असेल अशा प्रकारे केलेल्या विविध कामाची दखल घेत त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य पदावर वर्णी लागल्याचे दिसून येते. शहर वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मधुकर फलटणकर यांचे अनेकांनी अभिनंदन केलेले आहे.