*सलोनी हे कन्यारत्न मातीतून सोन्याच्या रुपाने परत धरतीवर यावे-सौ स्मिता राजपूत.*

करकंब /प्रतिनिधी
रजपुत कुटुंबीयांनी गमावलेले सलोनी हे कन्यारत्न मातीतून पुन्हा सोन्याच्या रुपाने परत या धरणीमाते वर यावे. असे भावस्पर्शी मत सौ स्मिता मोहन सिंग राजपूत यांनी व्यक्त केले.करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेचे आपट्याची वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगीबोलत होते
.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख,केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व शिक्षिका उपस्थित होते. करकंब केंद्रामध्ये आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापकनिबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये स्मिता मोहन सिंग राजपूत यांचा प्रथम क्रमांक आला. तसेच या निबंधाला पंढरपूर तालुक्यात नाही प्रथम क्रमांक मिळाला. त्याबद्दल हि त्यांचा विशेष सन्मान व सत्कार यावेळी करण्यात आला. जिल्हा स्पर्धेसाठी स्मिता राजपूत यांना सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.