*मोहोळचे माजी आ. रमेश कदम यांचे पंढरपूर भागात स्वागत* *नारायण चिंचोली येथील सूर्यनारायणाचेही घेतले दर्शन*

*मोहोळचे माजी आ. रमेश कदम यांचे पंढरपूर भागात स्वागत*  *नारायण चिंचोली येथील सूर्यनारायणाचेही घेतले दर्शन*

पंढरपूर/प्रतीनीधी

मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे जनतेतून मोठी लोकप्रियता मिळविलेले माजी आमदार रमेश कदम यांचे पंढरपूर भागातील जनतेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या भागातील गावभेट दौऱ्यामध्ये कदम यांनी नारायण चिंचोली येथील सूर्यनारायनाचे दर्शन घेत आशीर्वाद मिळविले आहेत.
    मोहोळ विधानसभा मतदार संघात आगामी निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी आणि मतदाराची मते जाणून घेण्यासाठी गावभेट दौरा सुरू केला आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील १७गावाला भेटी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये मोहोळ पेक्षाही पंढरपूर भागातून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि विविध जाती धर्मातील मतदार यांनी आगामी विधानसभा लढविण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे.
    रमेश कदम हे जनतेच्या विकास करण्यासाठी धाडशी नेतृत्व म्हणून परिचित आहेत. केवळ शासनाच्या निधीवर नाही तर स्वतः पदरमोड करून अनेक ठिकाणी विकास करून दाखविला होता. यामुळे आशा धाडशी आमदाराची या मतदार संघाला गरजच आहे. असे म्हणत आता रमेश कदम यांचेसाठी पंढरपूर तालुक्यातील १७गावातून तुफान पाठिंबा मिळत आहे.
    नारायण चिंचोली याठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी माजी सरपंच विठ्ठल माने, राजाभाऊ वाघ, लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष मुकुंद घाडगे, तालुका सचिव बापू घाडगे, हनुमंत घाडगे, रामा घाडगे, महेश घाडगे, मारुती घाडगे, शुभम घाडगे, रणजीत घाडगे, बालाजी शिंदे. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
...........
चौकट

*समाजाप्रती मातंग समाज एकवटला*


माजी आ. रमेश कदम हे मोहोळचे आमदार असताना सर्व मतदार यांची तर सेवा केलेली आहेच. परंतु आपला समाज म्हणून मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांना मोठ बळ दिले होते. याचीच उतराई म्हणून अवघ्या सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज रमेश कदम यांना पुन्हा एकदा आमदार करून दाखवायचे म्हणून समाजाप्रती एकवटला आहे. राजकारणात इतर कोणत्याही राजकीय पक्षात या समजतील कार्यकर्ते काम करत असेल तरी, केवळ आपला माणूस म्हणून राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन, रमेश कदम यांचेसाठी कायपण. असे जणू विचारात असून त्यांना आतापासूनच पाठबळ देण्यासाठी सरसावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.