*उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या समय सूचकता व निर्णय क्षमतेमुळे आंदोलनाला मिळाला पूर्णविराम....*..! *विरोधकांची कुरघोडी फसली; आणि आंदोलनाची ठिणगी वीझली*
करकंब /प्रतिनिधी:
करकंब ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी पार्टीचे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी ऐनवेळी दाखवलेल्या समय सूचकता व स्वतःच्या निर्णय क्षमतेमुळे आंदोलनाला पूर्णविराम मिळाला आहे. उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये जाऊन पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून गटारीचे पाणी जाण्यासाठी उपाययोजना केल्याने तसेच स्मशानभूमीत असलेली अस्वच्छता व इतर प्रश्न सोडवण्याचा बाबत सुरुवात केल्यामुळे विरोधी पक्षाने केलेली कुरघोडी फसली. आणि त्यामुळे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेल्या आंदोलनाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
वाद-प्रतिवाद करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून आज पर्यंत लोकांच्या विकासासाठी झटलो आहे .यापुढेही सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणार असून विकासाची कामे करून तक्रारीला महत्व न देता करकंब गाव जिल्ह्यातच नव्हे एक राज्यात आदर्श मॉडेल निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असून या माध्यमातून तालुका व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने यापुढे गावाचा नावलौकिक वाढवणार असल्याचे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून करकंब ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद-प्रतिवाद प्रचंड वाढले होते, भरीस भर म्हणून काय आंदोलनाने वेगळे वळण घेतल्यामुळे सत्ताधारी यांच्यापुढे मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती परंतु अशा परिस्थितीत उपसरपंच आदिनाथ देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य निर्णय क्षमता घेतल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.