*पंढरीत दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक*
पंढरपूर /प्रतिनिधी
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पंढरपूर शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मिरवणुकीत सामील होऊन बौद्ध बांधवांना शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीचे आयोजन भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम, पत्रकार अभिराज उबाळे, शिवाजी चंदनशिवे, रवी सर्वगोड, सचिन भोरकडे ऍड. किशोर खिलारे, विठ्ठल वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड,आदींसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गाण्याच्या तालावर लेझीमचे उत्कृष्ट असे सादरीकरण करण्यात आले.
धम्म चक्र प्रवर्तन दिन दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला, त्यामुळे हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून बौद्ध समुदायामध्ये महत्त्वपूर्ण आणि आदरणीय बनला. तेव्हापासून हा दिवस बौद्ध समाजातील लोक मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात.