*अखेर ते दोनशे खड्डे बुजवण्याचे काम सुरू.......*! . *शिव मल्हार न्यूज इफेक्ट* *सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल*
करकंब /प्रतिनिधी :
करकंब येथील करकंब चौक (शंकर नगर) ते मोडनिंब चौक या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर दोनशे खड्डे..... ठेकेदार बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूला आमंत्रण आहे पुढे....! या आशयाची बातमी लावताच बांधकाम विभागाला जाग आली, आणि अखेर आज हे दोनशे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.
या रस्त्यावर प्रचंड लहान-मोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू होती. याबाबत संबंधित बांधकाम विभागास सांगूनही ठेकेदार खड्डे बुजवण्यास व काम सुरू करण्यास तयार नव्हता. शिव मल्हार न्यूज च्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर कार्यकारी अभियंता द.म.गावडे यांच्याशी त्वरित संपर्क साधून या संबंधित रस्त्यावर होत असलेल्या अपघाताबाबत ची माहिती देऊन या रस्त्याचे काम कधी सुरू करणार बाबतचे विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक चर्चा करून त्वरित काम चालू करण्याचे सांगितले.कार्यकारी अभियंता द म गावडे यांनी लगेच सूचना केल्यानंतर हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे करकंब व परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जरी हे खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू असले तरी येत्या आठ दिवसात करकंब चौक (शंकर नगर) ते मोडनिंब चौक ते नवरा नवरी पर्यंत (मोडनिंब रोड) मंजूर असलेल्या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता- द म गावडे सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी सांगितले.