भालके गटाची मदार आता पक्ष कार्यावरच ! आगामी राजकारण टिकविण्यासाठी नवे आणि जुने पदाधिकारी यांच्यात मेळ घालीत  राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी योगदान   देणे  हाच एकमेव पर्याय....

भालके गटाची मदार आता पक्ष कार्यावरच !  आगामी राजकारण टिकविण्यासाठी नवे आणि जुने पदाधिकारी यांच्यात मेळ घालीत  राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी योगदान   देणे  हाच एकमेव पर्याय....

पंढरपूर / प्रतिनिधी 
 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मागील जवळपास बारा वर्षे आमदारकी असल्यामुळे मजबूत झालेल्या भालके गटाला थोडा धक्का बसला आहे. यापुढील काळात हा गट मजबूत ठेवायचा असेल तर आता  यापुढील काळात जुने आणि नवीन पदाधिकारी यांच्यात मेळ घालून राष्ट्रवादी पक्ष वाढविणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
                 पंढरपूर तालुक्यातील आजवरचे राजकारण पाहिले असता या तालुक्यात कोणत्याही राजकिय पक्षाचे स्थान नगण्य आहे.  या ठिकाणी दोनच  गट चालतात ते म्हणजे  पांडुरंग परिवार आणि दुसरा विठ्ठल परिवार.  यावरच किमान आजवरच्या सर्व विधानसभा निवडणुका पहावयास मिळाल्या आहेत. या पोटनिवडणुकीत तर आणखी एक चित्र वेगळंच पहावयास मिळालं ते म्हणजे भाजपचा आधार घेत पांडुरंग परिवार हा चक्क मंगळवेढा येथील दामाजी परिवारास  पुढे करून वेगळ्या पद्धतीने चाचपणी केली गेली. त्या चाचपणीस तर फारच मोठे अपयश पांडुरंग परिवाराला आले आहे. राजकीय अभ्यास असलेल्या लोकांना याबाबत बरेच काही समजले काही की या विट्ठल परिवाराला हरविण्यासाठी आपणाला आणखी बरेच कष्ट घेऊन काम करणाऱ्या लोकांची पारख करावी लागणार आहे.हा फार मोठा अभ्यास पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पांडुरंग परिवाराला करण्याची संधी मिळाली आहे.मागील दोन निवडणुकीत  मंगळवेढा भागातील एक नंबर चे मतदान घेतलेल्या दामाजी परिवार मात्र या पोटनिवडणुकीत पंढरपूर भागातील आपल्या हक्काची मते जवळ ठेवण्यात अपयशी ठरला आहे. याला करणेही तशीच आहेत. पांडुरंग आणि दामाजी परिवार एकत्रित असताना जे मताधिक्य मिळाले आहे, ते आगामी विठ्ठल परिवारासाठी कसलेही धोक्याचे नाही हे मात्र निश्चित झाले आहे.
     विठ्ठल परिवाराचे नेतृत्व आ भारतनाना भालके करीत होते. त्यांच्या निधनानंतर ती धुरा आता युवा नेते भगीरथ भालके यांच्याकडे आली आहे. या पोटनिवडणुकीत त्यांना अडथळे निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले, तरीही एकाकी झुंज देण्यास भगीरथ भालके थोडं अखेरच्या टप्यात कमी पडले असले तरी यामध्ये विठ्ठल परिवार मात्र कुठंही कमी पडला नसल्याचे दिसून आले आहे.
  आता निवडणूक संपली निकाल लागला तो निकाल काहीही असला तरी तो विजय मात्र दोन्ही एकत्रित आलेल्या परिवाराला धोक्याची घंटा दाखविणारा मात्र नक्की आहे. आगामी राजकारण पाहता यापुढील काळात भालके यांच्यापुढे येणारी विठ्ठल साखर कारखान्याची निवणूक आहे. यामधील राजकीय खेळीवर भालके गटाची पूर्णतः मदार अवलंबून आहे. असे असले तरी  विट्ठल परिवार मात्र  केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपली पकड कायम ठेऊ शकतो, त्यासाठी यापुढील काळात नवे आणि जुने हा मेळ घालून पक्ष मजबूत केल्यास  दोन्ही एकत्रित आलेल्या परिवाराला अजूनही भविष्यात चांगली टक्कर देऊ शकतो हे मात्र आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सिद्ध करेल यामध्ये शंखा राहणार नाही. 
    विठ्ठल परिवार मध्ये कितीही मतभेद असले तरी हा परिवार शरद पवार यांना मानणारे मधीलच सर्वजण आहेत ,त्यामुळे यापुढील काळातही तो एकसंघ राहून काम करेल याबाबत  कोणत्याही ज्योतिषाची गरज राहणार नाही.