*अक्षय वाडकर मित्रमंडळच्या रक्तदान शिबिरात 78 जणांचे रक्तदान* *स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग6मध्ये सेवा सप्ताह सुरू*

पंढरपूर/प्रतिनिधी
सहकारतपस्वी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि युवक नेते प्रणव मालक, युवा नेते रोहन मालक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय वाडकर मित्र परिवारातुन प्रभाग क्रमांक ६ मध्ये दिनांक १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत "सेवा सप्ताह" चे आयोजन केलेले आहे. आज पहिल्या टप्प्यातील भव्य रक्तदान शिबीरात ७८ रक्तदात्यांनी उस्फुर्त रक्तदान केले.
यावेळी प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व नगरसेवक आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, जेष्ठ मार्गदर्शक आणि तरुण सहकरी उपस्थित होते.