*राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे पहिले पाऊल*! *प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन* *उद्योग ,व्यापारा बरोबरच तरुणांच्या हातालाही काम मिळावे यासाठी केली एम आय डी सी च्या मंजुरीची मागणी*
पंढरपूर:-प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यामध्ये एम.आय.डी.सी.मंजूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा.नागेशदादा फाटे यांच्या वतीने महाराष्ट्राचे कर्तत्वदक्ष मुख्यमंत्री ना.उध्दवसाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
या देण्यात आलेल्या निवेदनात सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे, यामध्ये पंढरपूर परिसरात मनुष्यबळ व दळणवळणाचे सर्व महामार्ग उपलब्ध आहेत. परंतु साखर उद्योग सोडून इतर कोणतेही मोठे उद्योग धंदे याठिकाणी नाहीत. यामुळे चांगले शिक्षण घेऊनही नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगाराचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी.मंजूर झाल्यास येथील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होणार असून ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगाराचा प्रश्न कायमचाच मार्गी लागणार आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी एम.आय.डी.सी.मंजूर व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सुभाष बागल, वृक्षमित्र बिल्डर दत्ता बागल, पै.साहेबराव नागणे, मा.ग्रा.सदस्य गणेश बागल, विजय जाधव, तुकाराम बागल, निवृत्ती पाटील, अतुल मस्के आदी उपस्थित होते.
चौकट
नव्यानेच निवड करण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापारचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी पूर्वीपासूनच समाजसेवक म्हणून काम केले आहे. स्व. वसंतदादा काळे यांच्यापासून काळे परिवार यांच्यासोबत राहून कायम आपले समाजसेवक म्हणून कार्य केले आहे.त्यांच्याकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालकपदआहे. कॉग्रेस पक्षानेही पूर्वी त्यांच्यावर सेवादलच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती.

यानंतर बरेच पुलाखालून पाणी वाहून गेल्याने आता राष्ट्रवादीचे मुख्य नेतृत्वाने योग्य निवड करीत नागेशदादा फाटे यांना उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान केले आहे. याच दिलेल्या पदाचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली आहे. सध्या या विभागात काम करण्याची संधी मिळावी म्हणून राज्यभरातून फाटे यांच्याकडे अनेक वरीष्ठ नेत्यामार्फत शिफारशीने मागणी होत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊन राज्य कार्यकारिणी आणि प्रत्येक जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी आणि नवीन पदे देण्याबाबत वरीष्ठ नेतेमंडळीच्या सल्याने पदे जाहीर करण्यात येणार असल्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.