*करकंब येथे प्रथमच तलाठ्याचा होतोय सत्कार....*! *कार्यतत्पर व सन्मानाची वागणूक देणारा तलाठी म्हणून केला गावकऱ्यांनी सन्मान*. .
करकंब/ प्रतिनिधी
करकंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून तलाठी नसल्यामुळे राम भरोसे कारभार सुरू होता. सामान्य नागरिक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे त्यात शेतकऱ्यांचे असलेली कामे यामुळे वारंवार हेलपाटे तलाठी कार्यालयात मारावे लागत होते. चार ते पाच हजार खातेदार असलेले करकंब तलाठी सजा हे मोठे असल्याने या गावाला कायमस्वरूपी निवासी तलाठी असणे आवश्यक असल्याची अनेक शेतकऱ्यांमधून ग्रामस्थांतून मागणी होत होती. त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर करकंब तलाठी कार्यालयाकडे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर असलेले समाधान अभिमन्यू शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच शैक्षणिक कामाबरोबरच शेतकऱ्यांच्या ही कामाची कोणतीही तक्रार न ठेवता कामाने सुरुवात केली. गावाला एक समजूतदार लोकाभिमुख व लोकांचे समाधान करणारे आणि सामान्यांची अडवणूक व पिळवणूक थांबून सामान्यांना सन्मानाची वागणूक देऊन कार्यतत्पर काम करत असल्याची भावना करकंब ग्रामस्थांमधून व्यक्त होत असल्यामुळे त्यांच्या या कार्याबद्दल प्राध्यापक सतीश देशमुख, गजानन व्यवहारे यांनी विशेष सन्मान व सत्कार केला .

यावेळीमाजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, कोतवाल गुलाब कोरबु, चंद्रकांत उंबर दंड यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करकंब हे तलाठी सजा म्हणून मोठे गावापासून चार ते पाच हजार खातेदार असलेल्या तलाठी कार्यालयात सध्याचे कार्यतत्पर व सन्मानाची वागणूक देणारे तलाठी यांनी दोन दिवस थांबण्यापेक्षा किमान पाच दिवस थांबावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.