*प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा*” —: *मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर* *भाजपा सोलापूर ग्रामीणच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” ला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रदेश सचिव आ. रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गात संघटन मजबुती, विचारधारा, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया, कार्यविस्तार, सर आणि देशासमोरील आव्हाने अशा विविध विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा मिळेल असा विश्वास मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बीएलए -1 प्रतिनिधी तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. श्री पुनीतजी जोशी यांनी “विकास, संगोपन आणि जबाबदारी जाणीव” या विषयावर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांनी समाजाशी सतत संपर्क ठेवून जबाबदारीने संघटन कार्य करावे, असे सांगितले. त्यांनी विकासकामांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे ही आवाहन केले.
यावेळी मा. श्री महेरदीप महेश पाटणे यांनी “SIR” विषयावर मार्गदर्शन करत बूथ स्तरावर मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेची माहिती दिली. बोगस मतदारांची नावे कमी करणे, पात्र मतदारांची नोंदणी करणे आणि मतदार यादी अधिक पारदर्शक करण्यासाठी बीएलए-1 यांनी सक्रियपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवर जबाबदारीने काम करून संघटन अधिक सक्षम करावे, असेही त्यांनी सांगितले.
तर पश्चिम महाराष्ट्र विभागीय संवादक मा. श्री योगेशजी बाचल यांनी “बूथ व्यवस्थापन” विषयावर मार्गदर्शन करत प्रत्येक बूथ हा पक्षाचा मजबूत पाया असल्याचे सांगितले. बूथनिहाय नियोजन, मतदार संपर्क, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि निवडणूक व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री योगेशजी (आण्णा) टिळेकर यांनी “कार्यविस्तार” या विषयावर मार्गदर्शन करत भाजपा विचारधारा गावागावात पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घ्यावी, असे सांगितले. संघटन वाढीसाठी नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस मा. श्री सचिनजी शिंदे यांनी “विचार परिवार” या विषयावर मार्गदर्शन करत भाजपा ही केवळ राजकीय संघटना नसून राष्ट्रहिताची विचारधारा असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी वैचारिक बांधिलकी जपत समाजात काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोलापूर ग्रामीण (माढा) जिल्हा प्रभारी मा. श्री संजय जगताप साहेब यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यांनी विविध सत्रांची माहिती घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला व प्रशिक्षण वर्गाचे कौतुक केले.
श्री भारतजी आमदापुरे यांनी “देशासमोरील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करत राष्ट्रीय सुरक्षेपासून आर्थिक विकासापर्यंत विविध मुद्द्यांवर विचार मांडले. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांनी सजग राहून जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.
मा. श्री अनिकेतजी निकम यांनी “सोशल मीडिया आणि नमो ऍप” या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. नमो ॲप चा प्रभावी वापर करून कार्यकर्त्यांनी संघटनाशी सातत्याने जोडलेले राहावे, असेही त्यांनी सांगितले.
मा. श्री सुरेशजी हळवणकर यांनी “भाजपा इतिहास” या विषयावर मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. राष्ट्रहित, संघटनशक्ती आणि विचारधारा यावर भाजपा उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण वर्गाचा निरोप समारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार माजी खासदार मा. श्री रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिपकजी वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने संघटन कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मानले.
संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. विविध विषयांवरील सत्रांमुळे कार्यकर्त्यांना संघटन, निवडणूक व्यवस्थापन, डिजिटल प्रचार आणि वैचारिक बांधिलकी याविषयी सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान संयोजक श्री. सचिन शिंदे, सहसंयोजक श्री. दत्तात्रय जाधव तसेच सर्व आयोजक समिती यांची सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.