गादेगाव येथील ज्ञानेश्वर बागल यांच्या घराला आग युवा नेते प्रणव परिचारक यांनी भेट देऊन केली जीवनावश्यक वस्तूची मदत
पंढरपूर :प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ज्ञानेश्वर बागल यांच्या घराला आज सकाळी सहाच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच आ प्रशांतराव परिचारक यांच्या सुचनेनुसार गावातील सामाजिक कार्यकर्ते पिंटू कळसुले, यांच्यासह युवा नेते प्रणव परिचारक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान तलाठी भाऊसाहेब यांना पंचनामा करायला लावून तो शासनकडे पाठवून देण्यात आला. यावेळी आगीमुळे जे नुकसान झाले होते. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूही जळून गेल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी वरील लोकांनी मदत केली आहे.
या घटनास्थळी युवा नेते प्रणव परिचारक आले असता यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पळसुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र हुंडेकरी उपस्थित होते.