आ.भारतनानाच्या शिकवणुकीचे  भालके कुटुंबियांकडून तंतोतंत पालन सुरूच ! 'शुभेच्छा'... असोत ना, 'सांत्वनपर'... भेट , अजूनही  व्यंकटराव भालके अन भगीरथदादा भालके  यांच्याकडून  मनापासून भेटीची परंपरा जपण्याचे कार्य मात्र जोमात सुरूच---

आ.भारतनानाच्या शिकवणुकीचे  भालके कुटुंबियांकडून तंतोतंत पालन सुरूच !  'शुभेच्छा'... असोत ना, 'सांत्वनपर'... भेट , अजूनही  व्यंकटराव भालके अन भगीरथदादा भालके  यांच्याकडून  मनापासून भेटीची परंपरा जपण्याचे कार्य मात्र जोमात सुरूच---

पंढरपूर: प्रतिनिधी

 आपल्या भागात समाजकार्य करत असताना ज्यांच्यावर सुख आणि दुःखाचे प्रसंग येत असतात,त्यामध्ये आपणही सामील झाले पाहिजे ,ही भूमिका घेत आ, भारतनाना भालके यांनी 2004 पासून भेटी देण्याचा पायंडा पाडला होता. त्यामुळे त्यांना भलतीच लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या निधनानंतरही  ही आवर्जून आणि वेळेत भेटण्याची परंपरा त्यांच्याच कुटुंबाने जपली आहे. त्यांनीही ही परंपरा टिकविण्यासाठी अगदी वेळ न घालविता मनापासून व्यंकटराव भालके आणि चेअरमन भगीरथदादा भालके यांनी कार्य चालू ठेवले आहे, त्यामुळे भालके यांच्याबद्दलची जनतेच्या मनातील सहानुभूती अजूनही कायम हृदयात स्थान निर्माण करून राहिली आहे.
    स्व. आ. भारतनाना भालके यांनी  केवळ नुसत्या पंढरपूर तालुक्याचा एकच पंढरपूर मतदार संघ असताना विठ्ठलचे चेअरमनपद मिळाल्या नंतर 2004ला शिवसेनेच्या धनुष्यबाणवर निवडणूक लढविली होती.यामध्ये सुरुवातीला अपयश मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अपयश ही यशाची पायरी असते असे ठाम मनात धरून आपण आमदार व्हायचंच असा चंग बांधला होता. त्याच दरम्यान पंढरपूर मतदारसंघ पुररचनेत अखंड असणाऱ्या पंढरपूरची चार भागात विभागणी झाली अन याच मतदार संघात केवळ पंढरपूर शहर आणि22 गावांचा समावेश राहिला होता, तयाच पंढरपूर मतदारसंघात मंगळवेढा शहर आणि सर्व ग्रामीण भाग जोडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ असे नाव पडले होते.
   आगामी2009ची विधानसभा लढायचीच आणि जिंकायची याच हेतूने आ भारतनाना यांनी दररोज सकाळी मंगळवेढा  दौरे सुरू केले, यामध्ये दोन्ही तालुक्यातील प्रत्येक सुख दुःखात आपली भेट  निश्चित हे नित्याचेच झाले होते. या सुखदुःखातील भेटीमधून दोन्ही तालुक्यातील जनतेमध्ये कमालीची लोकप्रियता मिळाली होती. या लोकप्रियतेमध्ये  त्यावेळी झालेल्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आ भारतनाना भालके यांना मोठी आर्थिक मदत मिळून  फार मोठया मताने राज्यांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर विजय मिळाला होता. 


    त्यावेळी पासून कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद किती आहे हे न पाहता केवळ कष्टकरी जनता यांची साथ सोबत ठेवीत तीन वेळा विजय मिळविण्यासाठी आ भारत नानांना केवळ या सुखं दुःखातील दिलेल्या भेटीचीच मोठी शिदोरी पाठीशी उभी केली होती, आजही या लोकप्रिय आणि अडचणीत धाऊन येणाऱ्या या स्व भारतनानाची आठवण झोपडपट्टीतील कष्टकरी काढल्या शिवाय राहात नाही, किंबहुना असा लोकनेता या मतदार संघात परत कधी मिळेल या आशेने अजूनही या मतदारसंघातील जनता लवकरच विचार करू लागली आहे.
    याच धर्तीवर भालके कुटुंबानेही आपली नानांची परंपरा जपण्यासाठी  पर्यायाने आपल्यावर कोणतेही आरोप होऊद्या मात्र जनतेच्या सुखदुःखात हजेरी लावायची हे मात्र नक्की ठरविले असून दररोज याप्रमाणे दौरेही सुरू असल्याचे दिसून येत आहे.