*आरपीआयच्या करकब शहराध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची निवड*.

*आरपीआयच्या करकब शहराध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची निवड*.


करकंब/ प्रतिनिधी.
करकंब येथील राजेंद्र विजय शिंदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या करकंब शहर अध्यक्ष पदी निवड झाली.
युवकांना नेहमी बरोबर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारे राजेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष दयानंद बाबर, तालुकाध्यक्ष कैलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रदीपभाऊ खंकाळ यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की सामाजिक प्रश्न असतील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन गावात व तालुक्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्या न्याय व हक्कासाठी कायम त्याच्या पाठीमागे उभा राहणार व युवकांना बरोबर घेऊन जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्यांच्या निवडीमुळे करकम येथील आठवले गट त्याचबरोबर रोहिदास महाराज समाजसेवा मंडळ यांच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले.