*अभिजात संगीत परंपरा टिकवायची असेल तर रियाजाशिवाय पर्याय नाही:. ज्ञानेश्वर दुधाणे*
पंढरपूर:-प्रतिनिधी
मंगळवेढा तृतीय राज्यस्तरीय साहित्य व संगीत संमेलन (आँनलाईन)दिनांक ७/८आँगस्ट रोजी ज्ञानदीप विद्यालय येथे पार पडले.सुरुवातीला ग्रंथदिंडी काढून मा.पालकमंत्री लक्ष्मणजी ढोबळे.जेष्ठ नेते बबनरावजी आवताडे.जेष्ठ गायक शिवदासजी देगलूरकर. ज्ञानेश्वर दुधाणे.डॉ. प्रसाद कुलकर्णी.प्रकाश जडे.कल्पेश कांबळेरेखा जडे.डॉ. मिनाक्षी कदम.आदी मान्यवर उपस्थित होते.श्री भक्ती संगीत सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात ज्ञानेश्वर दुधाणे यांनी भक्ती म्हणजे भगवंताला आळवणे.याआधी अनेक संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. नामदेव महाराज. एकनाथ महाराज. यांनी आपल्या अभंग रचनेतून भगवंताची आळवणी करुन भक्ती कशी करावी हे आपल्या रोजच्या अनुभवातून जगाला आपल्या अभंगातुन पटवून दिले.लावूनी मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने यातून नामदेव महाराजांनी नादब्रह्म पखवाज या वाद्याचे वर्णन केलेले दिसून येते. पखवाज भक्ती रसपूर्ण वाद्य असून त्याच्या सततच्या रियाजामुळे एक आत्मिक समाधान मिळते. तसेच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती मुळे संगीत क्षेत्रावर वाईट दिवस आले असले तरी अशी वेळ कायम राहणार नाही. तो काळ जाईपर्यत उदयोन्मुख कलाकारांनी नियमित रियाज करणे खुप आवश्यक असून पालकांनीही आपल्या पाल्यांना साथ द्यावी. असे अवाहन केले. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जोपासायची असेल तर रियाजाशिवाय पर्याय नाही.त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. अशी संगीत संमेलन अनेक ठिकाणी आयोजित केली पाहिजेत. तर नक्कीच संगीतक्षेत्राला चांगले दिवस येतील.आणि या संगीत संमेलनात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या पखवाज वादन झाले. त्यामध्ये त्यांनी सुंदर उठान.चक्रधर. रेले.स्तुति परण.वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना सुंदर लहरा साथ पं शिवदास देगलूरकर यांनी केली.यावेळी मंगळवेढा येथील संगीतप्रेमी उपस्थित होते. या संगीत संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री कल्पेश कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.