* करकंब पोलीसांचा रूट मार्च*

* करकंब पोलीसांचा रूट मार्च*

करकंब /प्रतिनिधी:

करकंब पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये शांतता व कायदा व् सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करकंब पोलीस ठाण्याच्या वतीने करकंब गावातून आज रूट मार्च काढण्यात आला.

 करकंब पोलिसांचा हा रूट मार्च एसटी स्टँड,  म्हसोबा मंदिर आतार चौक थोरली वेस व गावातून हा पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. सध्या राज्यात सुरु असलेल्या अनुषंगाने तसेच सण-उत्सव व कोरणा च्या पार्श्वभूमीवर करकंब पोलीस स्टेशन व करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावामधील लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांतता राखण्याचे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी केले.