*वाळू माफिया व क्रश माफियांना यांना लगाम लावणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.* *जिल्हा प्रशासनाला केल्या सूचना.*
करकंब /प्रतिनिधी :
वाढत चाललेल्या वाळू माफिया आणि क्रश माफियांच्या मुजोरीमुळे सामान्य लोकांना याचा नाहक त्रास होत असल्याने अशा वाळू माफिया आणि क्रश माफियांना लगाम लावणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री-राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
करकंब येथील करकंब पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते आले असता बोलत होते. यावेळी खासदार रणजीत सिंह निंबाळकर, आमदार -बबनदादा शिंदे, माजी आमदार- प्रशांतराव परिचारक, विशेष पोलीस महानिरीक्षक- सुनील फुलारी, जिल्हाधिकारी - मिलिंद शंभरकर ,पोलीस अधीक्षक -शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक-हिम्मत जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी- विक्रम कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक- निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक- महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक- अजित मोरे, श्री.सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन-अभिजीत पाटील, सिव्हील इंजिनीयर -आनंद शिंगटे,राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक- नरसाप्पा देशमुख, जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष-गणेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य- अतुल खरात, मा. सरपंच दिलीप पूरवत, मा. उपसरपंच बाळासाहेब शिंगटे, प्राध्यापक- सतीश देशमुख,सरपंच संघटनेचे अध्यक्ष- आदिनाथ देशमुख सह सरपंच- प्रेम चव्हाण, अभिजीत कवडे, दगडू कांबळे, ज्योतीराम मदने, अभिजीत पाटील, विठाई महिला बचत गटाच्या तालुका अध्यक्षा- सुनीता देशपांडे, ज्ञानेश्वर दुधाने, डॉ. संतोष वलगे अदी सह, पोलीस अधिकारी कर्मचारी, बांधकाम विभाग, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी, पोलीस पाटील,ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी यामुळे वाळूमाफिया व क्रश माफियांना लगाम लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असून अधिवेशन काळामध्ये याबाबत हा विषय मांडणार असून आत्ता याबाबत काही मर्यादा असल्याने बोलणे उचित ठरणार नाही असल्याचे सांगून मात्र या वाळूमाफिया आणि क्रश माफियांना लगाम लावणार असल्याचे सांगून पोलिसांना राज्य सरकारकडून योग्य त्या सुविधा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. व यातून जनतेला दिलासा देण्याचे काम निश्चितपणाने यापुढील काळात करणार असल्याचे सांगितले.
*चौकट*
*सकाळी नियोजित नऊ चा कार्यक्रम तब्बल बारा वाजता सुरू.*
*कार्यक्रमास विलंबामुळे उपस्थित ग्रामस्थ , महिला उन्हाळ्यामुळे हैराण.*
*पालक मंत्र्याच्या आगमना वेळी "विज"गायब.*....*वीज कर्मचारी ठाण मांडून.*