*पैलवानाचेच  रक्त अंगात असल्याने  विरोधकांना त्यांची जागा दाखवणार.*.:-. - *भगीरथ भालके*

*पैलवानाचेच  रक्त अंगात असल्याने  विरोधकांना त्यांची जागा दाखवणार.*.:-. - *भगीरथ भालके*


 
           पंढरपूर /प्रतिनिधी

- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान युवा नेते श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन श्री भगीरथ भालके हे बोलत होते.
माझ्या अंगात पैलवानाचे रक्त असून चुकीच्या पद्धतीने मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही, विरोधकांनाही त्या पद्धतीने त्यांची जागा दाखवणार असल्याचे श्री विठ्ठलाचे कारखान्याचे चेअरमन श्री भगीरथ भालके यांनी खेडभोसे, देवडे, तरटगाव, आवे, नांदोरे, पेहे, शेवते या प्रचार सभेत व्यक्त केले. कै.आमदार भारतनाना भालके यांनी विधानसभेच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी विकास काय असतो हे उघड्या डोळ्यानी बघितलेला आहे. त्यानी सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना मानसिक, आर्थिक पाठबळ देण्याचे खुप मोठे काम केले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र 4 तालुक्यात  विखुरलेले आहे.  कारखान्याला अडचणीत आणणारे अडगळीत पडलेल्या युवराज पाटलला 10 वर्षे कारखान्याचे संचालक पद दिले. त्यांनी आमदार कै.भारतनाना असताना कोणतीच तक्रार केली नाही. मात्र त्यांच्या पश्चात त्यांनी साखर आयुक्त, हायकोर्ट येथे कारखान्याबद़दल तक्रारी दाखल करून अडचणी निर्माण केल्या. आज ते सभासदांना बिले तर कामगारांना पगार देत नसल्याचे सांगत आहेत. 25 वर्षे युवराज पाटलांनी सर्वसामान्य जनतेचे संपर्क ठेवला नाही. परंतु मी 6 महिन्यापासून नॉटरिचेबल असल्याचे सांगत आहेत. सभासद व कामगारांचा रोश माझ़ेवर कसा येईल हे काम युवराज पाटील यांनी केले आहे. असे कारखान्याचे चेअरमन श्री भगीरथ भालके  म्हणाले.
         यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस श्री दिलीप धोत्रे, संचालक गोकुळ जाधव, दसरथ खळगे तसेच सुधाकर कवडे, कांतीलाल भिंगारे, उत्तम नाईकनवरे, नंदकुमार पाटील, हनुमंत पवार, बंडू पवा,र नारायण शिंदे, शालिवाहन कोळकर, महेश कोळेकर, नंदकुमार उपासे,  पोपट शिंदे, पिंटू झांबरे, उल्हास पाटील, सागर कडलास्कर यांचेसह श्री विठ्ठल कारखान्याचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.