*आज पासून सुरळीत वीज पुरवठा होणार.* *करकंब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महावितरणच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला यश.....!*  *शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त*

*आज पासून सुरळीत वीज पुरवठा होणार.*  *करकंब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महावितरणच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला यश.....!*  *शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त*

*करकंब /प्रतिनिधी*

करकंब येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व विविध पदाधिकाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने करकंब येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या महावितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांबरोबरच ग्रामपंचायत च्या पदाधिकारी सदस्य व शेतकऱ्यांनी ठिय्याआंदोलन करून शेतकऱ्यांची त्वरित जोडा म्हणून आक्रोश मोर्चा केला. आक्रोश मोर्चा चे निवेदन स्वीकारण्यासाठी या महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता एन . बी. माने. स्वतः उपस्थित राहून संबंधित शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. व त्याबाबत निश्चित पणाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.*
*यावेळी महावितरण मोर्चा यावेळी कनिष्ठ अभियंता एन बी माने यांना  निवेदन उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव ,ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट शरदचंद्र पांढरे, राहुल शिंगटे, प्राध्यापक सतीश देशमुख मुस्तफा बागवान, पोपट धायगुडे , सुनील झिरपे ,लक्ष्मण नलवडे, घनश्याम नाना शिंगटे, नामदेव चेडे, बहुजन ब्रिगेड संघटनेचेपश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश खरे, काका देशमुख, आदीसह बहुसंख्य शेतकरी, युवक वर्ग ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ अभियंता यांनी निवेदन स्वीकारून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करणेस सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केलेल्या आंदोलनाला आज यश मिळाल्याची दिसून आले.*