*सिताराम साखर कारखान्याच्या उभारणीत ज्यांनी शेअर्सची रक्कम भरली त्यांना सभासदत्व नाहीच* *शेअर्सपोटी भरलेली रक्कम  व्याजासह  परत करण्याची ऍड दिपक पवार यांची मागणी* *रक्कम गोळा केली अनेक तालुक्यातील गावातून अन सभासदत्व मात्र वाडीकुरोलीसह शेजारच्याच   तीन गावातून* *वरील अजब कारभाराची कारभाराची चौकशी होणारच*

*सिताराम साखर कारखान्याच्या उभारणीत ज्यांनी शेअर्सची रक्कम भरली त्यांना सभासदत्व नाहीच*  *शेअर्सपोटी भरलेली रक्कम  व्याजासह  परत करण्याची ऍड दिपक पवार यांची मागणी*  *रक्कम गोळा केली अनेक तालुक्यातील गावातून अन सभासदत्व मात्र वाडीकुरोलीसह शेजारच्याच   तीन गावातून* *वरील अजब कारभाराची कारभाराची चौकशी होणारच*


पंढरपूर /प्रतिनिधी
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. दीपक पवार यांनी सिताराम साखर कारखान्यातील अधिकृत सभासदत्व संबंधीत आणि शेअर्स धारकांची यादी मिळवली आहे. या यादीत पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली, पिराची कुरोली आणि धोंडेवाडी येथील सुमारे ४८३७ सभासदांची नांवे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील तीन तालुक्यातून शेअर्स रक्कम गोळा करूनही, या गावातील सभासदांची यादी कल्याणराव काळे यांनी पुणे येथील आर.ओ. शी. कार्यालयाकडे कळवली असल्याचे मत ॲड. दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
       पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते तसेच सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी, पंढरपूर तालुक्यात महाघोटाळा केला असल्याचा खुलासा, ॲड. दीपक पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत हा खुलासा केल्यानंतर पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सिताराम साखर कारखाना लि. खर्डी या कारखान्याचे सभासदत्व मिळवून देण्याकामी, हजारो शेतकऱ्यांकडून सुमारे ३५ कोटी रुपये त्यांनी घेतले असून, तीन तालुक्यातून जमा केलेल्या या रकमेपैकी वाडीकुंरोली, पिराची कुरोली आणि धोंडेवाडी या तीनच गावांतील शेतकऱ्यांनाच सभासद करून घेण्यात आले असल्याची खळबळजनक माहिती यांनी पंढरीतील पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांच्या या माहितीने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 
    पंढरपूर तालुक्यातील सिताराम साखर कारखाना उभारताना, सन. २०१० ते २०१५ या कालावधीत, सहकार शिरोमणी कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी, आणि शिक्षण संस्थेतील कर्मचारी अशा हजारो नागरिकांकडून काळे यांनी ही रक्कम नाहक वसूल करून घेतली आहे. सिताराम कारखान्याची उभारणी होईपर्यंत ९  टक्के व्याजदर, तर हा कारखाना सुरू झाल्यानंतर नफा देण्याचे याप्रसंगी कबूल करण्यात आले होते. सीताराम कारखान्याची उभारणी मागील काही वर्षातच झाली होती. मध्यंतरीच्या काळात हा कारखाना कोणत्या संकटामुळे चालला नाही, हे सर्वास ठाऊक असल्याची माहिती यावेळी ॲड. दीपक पवार यांनी दिली आहे.
     आजमितीस सिताराम साखर कारखाना लि. खर्डी हा कारखाना, धनश्री परिवाराच्या शिवाजीराव काळुंगे सरांना विकला आहे. हे सर्व जिल्ह्यास परिचित आहे . कारखान्याची उभारणी झाली, कारखाना चालविता आला नाही आणि तो विकावा लागला, तरीही शेतकरी सभासद आणि ट्रॅक्टर मालकांकडून घेण्यात आलेली शेअर्स पोटीची रक्कम अद्यापपर्यंतही, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यासंदर्भात ॲड. दीपक पवार यांच्या मार्फत काही शेतकरी सभासदांनी या कारखान्याच्या शेअर्स रकमेबाबत ॲड. दीपक पवार यांनी काळुंगे सरांना विचारले असता , त्यांनी थेट आपले बोट कल्याणराव काळे यांच्याकडे केले. ही माहिती समजताच ॲड. दीपक पवार यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती घेतली , आणि पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठा महाघोटाळा पुढे आल्याचे त्यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
   कारखान्याकडे असलेल्या रेकॉर्डप्रमाणे शेअर्स यादीत जे लोक आहेत, त्यांचे पैसे खरोखर घेतलेले आहेत की नाहीत हे तपासात निष्पन्न होईलच. पावत्या धारकांचे ३५ कोटी आणि कारखाना रेकॉर्ड प्रमाणे सभासदांचे २४ कोटी, असे साधारण ६० कोटी रुपये, कल्याणराव काळे हे मागील १० वर्षापासून स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत आहेत . कंपनी कायदा तसेच सेबीच्या नियमाप्रमाणे, वार्षिक १५ % व्याजदराने, हे पैसे परत केले पाहिजेत, परंतु स्वतः काळे आणि काळुंगे यांच्याशी चर्चा केली असता, पैसे परत करण्यासाठी या दोघांनीही ठोस भूमिका घेतलेली नाही. यामुळेच आपण सेबी, आर.ओ.शी., जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे आपण तक्रार दाखल केली आहे.