*राष्ट्रवादी घेणार ' वेध भविष्याचा*' *मंगळवारी राष्ट्रवादीचे पंढरीत मंथन शिबिर
पंढरपूर /प्रतिनीधी
पक्ष संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिला असून, पंढरीत उद्या ' वेध भविष्याचा ' हे मंथन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील कॉलेज रोडवरील धनश्री हॉटेलमध्ये हे शिबिर पार पडणार असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.
सदरचे मंथन शिबिर हे मंगळवारी सकाळी १० वाजता कॉलेज रोडवरील धनश्री हॉटेल येथे होणार आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष , माजी आ. दिपकआबा साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हयाचे कर्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा सचिव लतीफ तांबोळी, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेश अध्यक्ष नगेशदादा फाटे, जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील, किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस मारुती जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड. गणेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे शिबिर पार पाडण्यासाठी तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, शहराध्यक्ष सुधीर भोसले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदिपदादा मांडवे , महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ राजश्री ताड, महिला शहराध्यक्ष सौ संगीता माने, यासह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादीचे विविध विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.