*विकास कामांच्या जोरावर परत एकदा खा.निंबाळकर यांना विजयी करा* *आ. प्रशांतराव परिचारक यांची जोरदार फिल्डींग*

*विकास कामांच्या जोरावर परत एकदा खा.निंबाळकर यांना विजयी करा*  *आ. प्रशांतराव परिचारक यांची जोरदार फिल्डींग*

पंढरपूर/प्रतिनीधी 

माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध विकास कामे केली आहेत .यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे. तरी निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामाला लागावे. अशी सूचना  आमदार व सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांनी केली.
             खा. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करकंब येथे पांडुरंग परिवाराची बैठक घेण्यात आली. त्यावेळी परिचारक बोलत होते यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. परिचारक म्हणाले गेल्या पाच वर्षात खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांच्या कामावर भाजपचे नेते व मतदार खुश आहेत.  यामुळे त्यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली. आहे माढा लोकसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावाचा समावेश आहे. या गावात विविध विकासकामे करून घेण्यासाठी खासदार निंबाळकर यांना साथ देणे गरजेचे आहे .निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदारांच्या होम टू होम जाऊन प्रचार करावा .असे सांगून परिचारक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब नागरिक महिला विद्यार्थी शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत. यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. पुन्हा तिसऱ्या वेळेस मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी खासदार निंबाळकर यांना विजयी करावे असे आवाहन केले.