*करकंब च्या थोरली वेस येथील युवकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त तलाठी कार्यालयाजवळ केले परिश्रम....!*

*करकंब च्या थोरली वेस येथील युवकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त तलाठी कार्यालयाजवळ केले परिश्रम....!*

करकंब/ प्रतिनिधी 

गेल्या काही महिन्यापासून तलाठी कार्यालय समोर थोरली वेस या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता फोडून पाईपलाईन करण्याच्या कामानिमित्ताने काम करण्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच या शासकीय कार्यालय असलेल्या तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी तसेच ग्रामस्थांना त्याचा प्रचंड मानसिक त्रास होत होता. एकीकडे सर्व भारत देश हर घर हर तिरंगा.. यानिमित्ताने अमृत महोत्सव साजरा करीत असताना  तलाठी कार्यालय तसेचअनेक दिवसापासून जाण्या येण्याच्या या मुख्यमार्गावरच जाण्याची मोठी अडचणी निर्माण झाल्यामुळे या त्रासाबाबत सांगूनही काहीही पडला नाही.त्यामुळेअखेर थोरली वेस येथील युवकांनी हातामध्ये खोऱ्या.. पाटी... टिकाऊ घेऊन मुख्य रस्ता व्यवस्थित रित्या करून 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी सुव्यवस्थित केल्यामुळे या थोरल्या वेस युवकांनी केलेल्या परिश्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.