*राज्यस्तरीय संगीत संमेलन लोक संगीत सत्राच्या अध्यक्षपदी रविंद्र शेवडे* *तर उपशास्त्रीय संगीत सत्राच्या अध्यक्षपदी जब्बार मुर्षाद*

*राज्यस्तरीय संगीत संमेलन लोक संगीत सत्राच्या अध्यक्षपदी रविंद्र शेवडे*  *तर उपशास्त्रीय संगीत सत्राच्या अध्यक्षपदी जब्बार मुर्षाद*

 प्रतिनिधी:/पंढरपूर
राज्यस्तरीय संगीत संमेलनात लोकसंगीत सत्राच्या अध्यक्षपदी पंढरपूर येथील रविंद्र शेवडे तर उपशास्त्रीय संगीत सत्राच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जब्बार मुर्षाद यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहीती संयोजन समीतीचे अध्यक्ष कल्पेश कांबळे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून गायन,नाट्य,पथनाट्य शॉर्टफिल्म,वेबसिरीज,आणि चित्रपट अश्या विविध क्षेत्रात शेवडे हे काम करीत असून ते लोककलावंतांच्या विविध प्रश्नांबाबतही काम करीत आहेत.त्यांनी सोलापूर आकाशवाणीवर प्रबोधन गीते सादर केली असून सिने संगीतकार बाळ पळसुले यांच्या सोबतही काम करण्याची संधीही त्यांना मिळाली आहे तसेच त्यांच्याच संगीत दिग्दर्शनाखाली सिध्दार्थ प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेली गाणी आणि निर्मिती असलेली "राजा हो शेतकरी राजा " ह्या गाण्याच्या अलब्मची निर्मिती केली असून पंढरपुरातील २०१४ साली झालेल्या नाट्य संमेलनामध्ये सहभाग आणि शेतकरी गीत सादर केले आहे.अनेक स्पर्धात्मक एकांकिकेतही त्यांनी काम केले आहे.त्याच बरोबर उपेक्षित आणि वंचित कलाकारांचे "स्वरगन्ध चॅरिटेबल स्ट्रस्टच्या" माध्यमातून ते सन्मानाचे काम ते सध्या करत आहे.त्याचबरोबर स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा ग्रुप असून कलाकारांना ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काम करणेची संधीही ते उपलब्ध करुन देत आहेत.सध्या ते एस.बी.आय.लाईफ मध्ये सल्लागार म्हणून काम पाहत असून समाज सेवेतही ते अग्रेसर आहेत.
   हर्षद मुर्षाद हे सोलापूरचे असून गेली ३० वर्ष ते संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.अनेक चित्रपट,अल्बम,दुरदर्शन वरील मालिकांना त्यांनी संगीत दिले आहे.कोरोना काळात त्यांना ४० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. गीता गौतम या चित्रपटासाठी त्यांना आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रविंद्र शेवडे व जब्बार मुर्षद यांच्या निवडीने संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल सावंत,सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,मसाप दामाजी, प्रकाश जडे,नाट्य परिषद अध्यक्ष डॉ.सुभाष कदम आदींनी त्यांचे अभिनंदन  केले आहे.