*दहा लाखाच्या कामाला दहा वेळा उद्घाटन.... काम कधी होणार पटकन...!*.

 *दहा लाखाच्या कामाला दहा वेळा उद्घाटन.... काम कधी होणार पटकन...!*.


 *करकंब /प्रतिनिधी*

: करकंब हे पंढरपूर तालुक्यातील सुमारे 30 ते 35 हजार लोकसंख्येचे गाव... या गावाला सहा प्रभाग (वार्ड) असून या सहावा वार्डमधील वार्ड क्रमांक 4 ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत नेहमीच सत्तेचा केंद्रबिंदूराहिला असून सर्वात महत्वाचा आणि महत्वपूर्ण असलेला बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा त्यातच याच वार्डातून राजकारणाच्या किल्ल्या कशा फिरवल्या जातात . यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधक आपणच कशापद्धतीने गावाचा विकास करू शकतो अशा अविर्भावात कधी आमरण उपोषणाला बसले, या ना त्या मार्गे सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. शेवटी काय ना गावाच्या विकासाच्या कामासाठी फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांनी मिलीभगत करून आलेल्या निधीची अशा पद्धतीने वाटप करून कामे कशा पद्धतीने करता येईल. अशा भूमिकेतून विरोधक असल्याचे बोलले जात आहे . त्यातच अशा पद्धतीच्या या वार्ड क्रमांक चार मधील व्यवहारे गल्ली येथील गजानन कुरणावळ ते लहू सुतार अशा पद्धतीने जिल्हा परिषद स्थरातून गेल्या दोन महिन्यांपूर्वी दहा लाख रुपयाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून दोन महिने झाल्यानंतर या दहा लाखाच्या कामाचे आज पर्यंत हा वेळा उद्घाटन करण्यात आले . कधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कधी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य तर कधी पदाधिकारी कधी येणारा जाणारा कार्यकर्ता त्यातून कोण नाही मिळाला तर हुडकून आणून त्याच्या हस्ते उद्घाटन त्याच्या हस्ते ही उद्घाटन झाल्याचे चित्र दिसून येते .रस्ता मात्र अजून तसाच आहे स्टंटबाजी दिखाऊपणा वीस पंचवीस वर्षात दहा वीस लाखाचा रस्ता मंजूर करून आणायचा त्याचे फोटो सेशन करून उद्घाटन करायचे परत दुसऱ्या वर्षी त्याचा रस्त्यांच्या कामाची मंजुरी आणायची असे करकंब अनेक रस्त्याच्या बाबत झाल्यामुळे नेमके कोणत्या रस्त्याचे कुठे गुरु घाटन झाले कुठल्या रस्त्याचे कुठे काम सुरू आहे याचा थातुरमातुर हिशोब हा फक्त ठेकेदार आणि संबंधित अधिकारी फोटोसेशन करणाऱ्याला जरी माहीत असले तरी शेवटी काय ए पब्लिक है ....पब्लिक ...  ऐ सब कुछ जानती है .....अंदर क्या है ....बाहर क्या है,.. सबकुछ जानती है....!  यामुळे प्रत्येक वर्षी येणाऱ्या निधीत त्या त्या रस्त्याच्या कामाला उद्घाटन मात्र मोठ्या थाटामाटाने केली जातात कामे मात्र निकृष्ट होत असल्याची चर्चा मात्र लोकातून होताना दिसून येते.*