*भाई नितीन काळे यांची प्रदेश सचिवपदी निवड* *भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र*

*भाई नितीन काळे यांची प्रदेश सचिवपदी निवड*  *भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर तालुक्यातील धडाडीचे नेतृत्व भाई नितीन काळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या सहीने देण्यात आले. सदरचे नियुक्ती पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर जिल्ह्यात दौरा आहे. यामध्ये पंढरपूर येथे आले असता, त्यांनी नितीन काळे यांना पत्र देण्यात आले. त्यामुळे ही निवड योग्य करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. 

 यावेळी  मा. आमदार  प्रशांत  परिचारक ,आ.  समाधान  आवताडे मा. खासदार  अमर साबळे,  नगरसेवक डि राज सर्वगोड, माऊली हळवणर यांचेसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.