*भाळवणी येथील शाळेच्या उदघाटनाचे खा. शरद पवार यांना निमंत्रण* *शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांचेसह मुख्याध्यापक यांची उपस्थिती*

*भाळवणी येथील शाळेच्या उदघाटनाचे खा. शरद पवार यांना निमंत्रण*  *शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांचेसह मुख्याध्यापक यांची उपस्थिती*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार  यांची रयत शिक्षण संस्था, सातारा येथे सदिच्छा भेट घेत शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांचेसह शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

शरदचंद्र पवार हे अध्यक्ष आहेत तर न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, भाळवणी, ता पंढरपूर येथील संस्थेच्या स्कुल कमेटी चेअरमन म्हणून संभाजीराजे शिंदे यांनी निमंत्रण दिले आहे.
    शाळेच्या उदघाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले.त्यावेळी पवार यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य, चेअरमन, न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, भाळवणी व शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग  संभाजी शिंदे यांच्या हस्ते “श्रीं” चे उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मा. एन. एम. गायकवाड सर, प्रभारी मुख्याध्यापक रोकडे सर, ग्रंथपाल उत्तम शिंदे उपस्थित होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.