*पंढरीतील संचारबंदीचा कालावधी कमी करण्यासाठी दोन आमदारांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एकत्रित निवेदन!* *आ. प्रशांतराव परिचारक यांच्याच लेटरवर आ. समाधान आवताडे यांचीही सही* *आषाढीला गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने केली नऊ दिवसाची संचारबंदी* *वरील दोन्ही आमदारांनी केली अवघी तीन दिवसांच्या संचारबंदीचीच मागण*
पंढरपूर : प्रतिनिधी
मागील वर्षीपासून कोरोनामुळे पंढरीतीतील सर्वच यात्रा बंद ठेवल्या जात आहेत, अशातच यावर्षीचीही ही आषाढी वारीही होणार नाही हे प्रशासनाने कळविले आहेच, परंतु या कालावधीत संचारबंदीही घालण्यात आली आहे. त्याचा कालावधी खूपच जास्त दिवसाचा म्हणजे नऊ दिवसाचा ठेवण्यात आला आहे. हाच कालावधी कमी करून तो अवघा तीन दिवस ठेवण्यात यावा यासाठी आ. परिचारक आणि आ. आवताडे यांनी एकत्रित निवेदन तयार करून आज उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना दिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने पंढरपूरशहर आणि लगतच्या नऊ गावामध्ये चक्क नऊ दिवसाची संचारबंदी लागू केली आहे, ही संचारबंदी जास्तच दिवसाची असून यामध्ये परिसरातील शेतकरी यांच्याकडे असलेल्या भाजी, आणि धान्य तसेच व्यापारी यांचा विचार करता मोठे नुकसान होऊ शकतेय, त्यामुळे ही दिनांक17जुलै ते25जुलै पर्यंत जाहीर केलेली संचारबंदी आदेश रद्द करून तो कालावधी केवळ तीन दिवस म्हणजे दि19जुलै ते21 जुलै पर्यन्त ठेवावे अशी एकत्रितपणे मागणी केली आहे.

आषाढी वारी ही मोठी वारी असते, या वारीसाठी येणारे भाविकांची संख्याही मोठीच असते ,म्हणूनच कोरोनाच्या या परिस्थिती धोका वाढू नये म्हणून ही काळजी घेण्यात आली होती. परंतु व्यापारी आणि शेतकरी यांच्या दृष्टीने ही संचारबंदी कमी करावी ही रास्त मागणी करण्यात आली असली तरी याबाबत काय आणि किती दिवस संचारबंदी राहणार हे लवकरच समजणार असुन पुढील दिशाही अजितदादा पवार यांच्या घोषणेनंतर समजणार आहे.